ऊसतोडी कामगारासंदर्भात झालेला करार नातेवाईकांच्या संघटनामध्ये : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप ; कामगारांना कोणतही वाढ मिळालेली नाही - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, October 29, 2020

ऊसतोडी कामगारासंदर्भात झालेला करार नातेवाईकांच्या संघटनामध्ये : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप ; कामगारांना कोणतही वाढ मिळालेली नाहीऊसतोडी कामगारासंदर्भात झालेला करार नातेवाईकांच्या संघटनामध्ये : प्रकाश आंबेडकर यांचा आरोप ; कामगारांना कोणतही वाढ मिळालेली नाही 

माणदेश एक्सप्रेस टीम  पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीला सर्व संघटनांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली. 

परंतु याच दरवाढीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही सवाल उपस्थित करीत झालेली दरवाढ ही नातेवाईकांच्या संघटनेमध्ये झालेली असून या झालेल्या करारावर कोणत्याही प्रकारच्या सह्या झालेल्या नसून कामगारांचा फक्त वापर करून घेणार असल्याची टीका त्यांनी नाव न घेता पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यावरती केली आहे. तर कामगारांनी संप आणखी काही दिवस वाढवा असे सांगितल्याने ऊसतोड कामगार संपाबाबत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

 
मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

संपादन : धिरज प्रक्षाळे Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise