आजोबा शरद पवार यांच्यानंतर वडिल अजित पवार यांच्याकडून ही पार्थ पवार यांच्याकडे दुर्लक्ष - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, October 2, 2020

आजोबा शरद पवार यांच्यानंतर वडिल अजित पवार यांच्याकडून ही पार्थ पवार यांच्याकडे दुर्लक्षआजोबा शरद पवार यांच्यानंतर वडिल अजित पवार यांच्याकडून ही पार्थ पवार यांच्याकडे दुर्लक्ष


पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र व मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या ट्विटवरून पवार कुटुंबियांतचं अंतर्गत वाद निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण याआधी सुद्धा पार्थने केलेल्या ट्विटला कवडीची किंमत नसल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नसल्याचंच सूचकपणे सांगितलं.


अजित पवार आज पुणे स्टेशन येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना, पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. तुम्ही तुमची मुलं काय ट्विट करतात हे पाहता किंवा विचारतात का? असा प्रश्न विचारला आहे. यातून त्यांनी आपण पार्थ पवार यांच्या ट्विटकडे फारसं लक्ष देत नसल्याचंच सूचकपणे सांगितलं आहे. यावेळी त्यांनी पार्थ पवार यांच्या ट्विटवर सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा एखदा पार्थ पवार तोंडघाशी पडले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise