अभिनेत्री पायल घोषने केला “या” राजकीय पक्षामध्ये प्रवेश - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, October 26, 2020

अभिनेत्री पायल घोषने केला “या” राजकीय पक्षामध्ये प्रवेशअभिनेत्री पायल घोषने केला “या” राजकीय पक्षामध्ये प्रवेश  


मुंबई : सिने निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली सिनेअभिनेत्री पायल घोष हिने आज रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पायल घोषला पक्षात प्रवेश देण्यात आला. 


निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यानंतर चर्चेत आलेली सिने अभिनेत्री पायल घोष ही चर्चेत आली होती. त्यावेळी तिला रामदास आठवले यांच्या आरपीआय ने पाठींबा दिला होता. अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांची सखोल चौकशी करून त्वरित त्यांना मुंबई पोलिसांनी अटक करायला पाहिजे होते मात्र अद्याप तशी कारवाई झालेली नाही. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise