आटपाडीतील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस तोडफोड प्रकरणी आरोपीस अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, October 10, 2020

आटपाडीतील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस तोडफोड प्रकरणी आरोपीस अटकआटपाडीतील बजाज फायनान्स कंपनीचे ऑफिस तोडफोड प्रकरणी आरोपीस अटक

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील विद्यानगर परिसरात असणारे खाजगी कंपनीचे फायनान्स ऑफिस फोडल्याप्रकरणी संतोष ऐवळे यास अटक केली. दिनांक ८ रोजी सायंकाळी ६.३० ला संतोष ऐवळे याने बजाज फायनान्स व डीटीडीसी कुरियर ऑफिस मध्ये जाऊन धिंगाणा घातला. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तेथील कर्मचारी प्रेमकुमार मोरे यास मारहाण केली.तसेच  सुजाता नितीन वाघमोरे यांना मोबाईलची मागणी करू लागला. त्यांनी मोबाईल दिला नसल्यामुळे कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण केली व ऑफिसच्या काचा अंदाजे फोडून ४० ते ४५ हजार रुपयांचे नुकसान केले.


तसेच दारूच्या नशेत स्वता:वर ब्लेडने वार करून जखमा करून घेतल्या. याप्रकरणी कर्मचारी प्रेमकुमार मोरे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात संतोष ऐवळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. काल गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी संतोष ऐवळे यास अटक केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise