Type Here to Get Search Results !

आटपाडीत १ लाख १२ हजाराची घरफोडी ; घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव




आटपाडीत १ लाख १२ हजाराची घरफोडी ; घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव 

माणदेश एक्सप्रेस टीम 



आटपाडी/प्रतिनिधी : येथील विकास श्रीमंत देठे यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाकडी शोकेस कपाटामध्ये ठेवलेले १ लाख १२ हजार रोख रक्कम व ५०० रुपयांचा माल असे १ लाख १२ हजार ५०० रुपयांची धाडसी चोरी आटपाडीतील ओंकार पॅलेस येथे घडली झाली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



विकास देठे हे आटपाडी येथील ओंकार पॅलेस येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. दिनांक २४/०९/२०२० च्या सांयकाळी ते दिनांक १/१०/२०२० च्या दरम्यान खोली ही बंद असल्याने या दरम्यान चोरट्यांनी आपली डाव साधला असून विकास देठे यांच्या घरातून तब्बल १ लाख १२ हजार ५०० रुपयांची धाडसी चोरी केली आहे. याबाबत आटपाडी पोलिसात सदर घटनेची नोंद झाली असून सदर घटनेचा अधिक तपास सपोनि गभाले हे करीत आहेत.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies