Type Here to Get Search Results !

स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये "वर्ल्ड फार्मासिस्ट डे" संपन्न



स्वेरीज कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये "वर्ल्ड फार्मासिस्ट डे" संपन्न

पंढरपूर : 'स्वेरी 'संचलित कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर मध्ये काल दि.२५ सप्टेंबर रोजी ‘वर्ल्ड फार्मासिस्ट डे’ साजरा करण्यात आला. कोरोनामुळे महाविद्यालय पूर्णतः बंद आहे.  त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये येऊ शकत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन व्हिडिओ मेकिंग कॉम्पिटिशन (विषय: पर्सनल हायजिन)आणि  अँटि बायोटिक्स  व एक्सपायरेड मेडिसिन या विषयावर निबंध लेखन  आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये "पर्सनल हायजिन केअर" हा विषय व्हिडिओ मेकिंग साठी देण्यात आला होता. तसेच निबंध स्पर्धेसाठी  "रॅशनल युस ऑफ अँटिबायोटिक्स "आणि "हाऊ टू डिस्पोझ एक्सपायरड अँड नॉट यूज्ड  मेडिसिन " या विषयावर स्पर्धांचे आयोजन केले होते.  


यंदाच्या जागतिक फार्मासिस्ट दिनाचे बोधवाक्य ‘ट्रान्सफॉर्मिंग ग्लोबल हेल्थ’ हे होते. यामध्ये बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी सांगितले की ' कोरोनासारख्या असाध्य रोगावरती औषध आणि व्हॅक्सीन बनवण्यासाठी औषध निर्माण शास्त्रातील शास्त्रज्ञ परिश्रम घेत आहेत.  


आज रुग्णाला औषधे देत असताना त्याचे कौन्सिलिंग करणे, औषधाविषयी सविस्तर माहिती देणे, औषध घेण्याच्या वेळा सांगणे आदी महत्वाची जबाबदारी फार्मासिस्ट पार पाडत असतो आणि हेच काम गेले कित्येक दिवस फार्मासिस्ट रात्रंदिवस करत आहेत.' तसेच ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’ निमित्त ऑनलाईन वेबिनार आयोजन करण्यात आला होता. यामध्ये ‘इंटरप्रेनिरशिप अँड  इफेक्टिव्ह फार्मा स्किल्स’ यावर बोलताना ग्लेनमार्क चे वरिष्ठ उत्पादन व्यवस्थापक राहुल लाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  


इंडस्ट्रीमध्ये लागणाऱ्या विविध फार्मा स्किल्स बद्दल व  उपलब्ध असणाऱ्या संधीबद्दल देखील सविस्तर माहिती दिली. यानंतर कृष्णा कातपुरे, वैद्यकीय व्यवसाय सहाय्यक, यांनी  विद्यार्थ्यांना नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे बना असा  महत्वपूर्ण उपदेश केला. हा कार्यक्रम स्वेरीचे  संस्थापक सचिव डॉ.बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली,  सांस्कृतिक विभागचे  समन्वयक प्रा.विजय चाकोते, प्रा. दिपाली वाघ यांनी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले तर प्रा. ज्योती मोरे यांनी या वेबिनार मध्ये सहभागी उपस्थितांचे आभार मानले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies