सांगोला तहसील कार्यालय येथे धनगर समाज्याचे वतीने "ढोल बजाओ सरकार जगाओ" आंदोलन संपन्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 27, 2020

सांगोला तहसील कार्यालय येथे धनगर समाज्याचे वतीने "ढोल बजाओ सरकार जगाओ" आंदोलन संपन्नसांगोला तहसील कार्यालय येथे धनगर समाज्याचे वतीने "ढोल बजाओ सरकार जगाओ" आंदोलन संपन्न

सांगोला/प्रतिनिधी- शुक्रवार दि 25 सप्टेंबर रोजी सांगोला तहसील कार्यालय, सांगोला येथे सकल धनगर समाज यांच्यावतीने धनगर समाज्याच्या एस.टी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे या मागणीसाठी "ढोल बजाओ सरकार जगाओ" आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन हे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात व खेडोपाड्यात करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून सांगोला तहसील कार्यालय येथे धनगर समाज बांधव यांच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.


 या आंदोलन प्रसंगी उल्हास धायगुडे यांनी धनगर समाज्याला शासनाने आरक्षण द्यावे अन्यथा भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला. त्यानंतर  बाबू गावडे यांनी आरक्षण नाही दिल्यास भविष्यात शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील व आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सांगितले.


सदर आंदोलनास सम्राट सेना सरसेनापती प्रा. बाळासाहेब सरगर, नगरसेवक मा.श्री.आनंदा माने , यशवंत सेना तालुकाअध्यक्ष आनंदराव मेटकरी , बिरूदेव शिंगाडे , उल्हास धायगुडे , बाबू गावडे , आमोल खरात , शंकरराव मेटकरी, काशिलींग गाडेकर, नवनाथ शिंगाडे, म्हाळाप्पा शिंगाडे, दीपक श्रीराम,  व अनेक मान्यवर समाज बांधव यावेळेस उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise