मुंबई शिवसेनेच्या बापाची का? भाजप नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

मुंबई शिवसेनेच्या बापाची का? भाजप नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोलमुंबई शिवसेनेच्या बापाची का?  भाजप नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल


मुंबई :  कंगना राणावत आणि शिवसेना वाद आता काही केल्या थांबताना दिसत नाही. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले हरियाणाचे गृह आणि आरोग्यमंत्री तथा भाजपाचे आक्रमक नेते अनिल विज यांनी या वादात उडी घेतली आहे.  


त्यांनी शिवसेनेला इशारा देत, शिवसेनेचे नेते सत्य बोलण्यापासून कुणालाही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.


कंगनाचे समर्थन करताना विज यांनी शनिवारी शिवसेनेवर जबरदस्त हल्ला चढवला. ते म्हणाले, “मुंबई काय शिवसेनेचा खानदानी भू-भाग आहे का? का त्यांच्या बापाचा प्रदेश आहे? मुंबई भारताचा भाग आहे. तेथे कुणीही जाऊ शकतो. जे अशा प्रकारच्या धमक्या देतात त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. आपण कुणालाही सत्य बोलण्यापासून रोखू शकत नाही.”


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise