अजित पवारांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली ; कोण म्हणाले वाचा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 8, 2020

अजित पवारांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली ; कोण म्हणाले वाचा बातमी सविस्तरअजित पवारांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली ; कोण म्हणाले वाचा बातमी सविस्तर  


मुंबई “शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी आल्या आणि आमचं सरकार आलं, म्हणून पुन्हा एकदा या पदावर निलमताईंनाच नियुक्त करण्यात आलं,” असं अजित पवार यांनी म्हणताच अजित पवारांच्या या टीपण्णीला तितक्याच मिश्कीलतेने भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिले आहे.


भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांना मिश्कील टोला लगावला. “आमच्यासाठी अजित पवारांचा पायगुण काय होता हे महाराष्ट्रानं पाहिला आहे. आमच्या बरोबर अजित पवार आले तेव्हा सत्तेचं काय झालं? अजित पवारांच्या पायगुणामुळे आमची सत्ता गेली,”असं दरेकर म्हणाले. दरेकरांच्या या वक्तव्यानंतर संबंधितांमध्ये हशा पिकला.  


राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागले होते. भाजपा आणि शिवसेनेत मतभेद झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी अजित पवारांनी भाजपाला पाठिंबा देत, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाचे हे सरकार जास्त काळ तग धरु शकले नाही. केवळ दीड दिवसांत हे सरकार कोसळले होते. अजित पवारांनी पुन्हा काँग्रेस व शिवसेनेसोबत आपला सत्तास्थापनेचा घरोबा बसवला. यावरुन प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांच्या पायगुणामुळे आमचे सरकार गेल्याचं म्हणाले.


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise