अजनाळे येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याअभावी सतत बंद अवस्थेत ; नूतन ग्रामसेवक संदीप सरगर लक्ष देतील का? - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 10, 2020

अजनाळे येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याअभावी सतत बंद अवस्थेत ; नूतन ग्रामसेवक संदीप सरगर लक्ष देतील का?अजनाळे येथील जलशुद्धीकरण प्रकल्प पाण्याअभावी  सतत बंद अवस्थेत ; नूतन ग्रामसेवक  संदीप सरगर लक्ष देतील का?                    

माणदेश एक्सप्रेस टीम


अजनाळे/सचिन धांडोरे : जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा समाज कल्याण विभाग यांच्याकडून २०१९-२० यावर्षीच्या २० टक्के सेस फंडातून अजनाळे गावाला जलशुद्धीकरण सयंत्रसाठी २ लाख ९२ हजार रु खर्चून जल शुद्धीकरण सयंत्र निर्माण केले आहे. मात्र या जलशुद्धीकरण प्रकल्पसाठी पाणी नसल्यामुळे हा जलशुद्धीकरण असून अडचण नसून खोळंबा अशी दयनीय अवस्था या जलशुद्धीकरण प्रकल्पाची झाली.


अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे याची माहिती देऊन सुद्धा दररोज पाणी मिळत नसल्यामुळे वाड्या-वस्त्या वरील नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे. पाणी नसल्यामुळे नागरिकांची कुचबंना होत असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावाला शुद्ध पाणी मिळावे या हेतूने समाज कल्याण सभापती  संगिता धांडोरे यांनी लाखो रुपये खर्चून प्रकल्पाची उभारणी केली. परंतु ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे हा प्रकल्प सतत बंद अवस्थेत असतो.


प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन जलशुद्धीकरण प्रकल्प कायमस्वरूपी चालू करावा अशी मागणी गावातून व वाड्या-वस्त्या वरील नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात केली जात आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise