करगणी गावात जनता कर्फ्यु चे तीन तेरा.... - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

करगणी गावात जनता कर्फ्यु चे तीन तेरा....


करगणी गावात जनता कर्फ्यु चे तीन तेरा....

माणदेश एक्सप्रेस न्युज


करगणी/नंदकुमार कोळी : आटपाडी तालुक्यातील  करगणी  गावांमध्ये  जनता कर्फ्यू चे तीन तेरा  वाजले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी ११ सप्टेंबर पासून १० दिवस सांगली जिल्ह्यात जनता कर्फ्यू चे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तरीही करगणी गावामध्ये या जनता कर्फ्यु ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. बाजार पेठेत काही  दुकाने बंद तर काही दुकाने उघडी आहेत. बाजारपेठेतून खरेदीसाठी आलेले लोक कसल्याही परिस्थितीला न घाबरता  बाहेर पडत आहेत त्यापैकी बरेच लोक हे  आपल्या तोंडाला मास्क किंवा रुमाल न बांधता बिनधास्तपणे फिरत आहेत त्यामुळे  कोरोना विषाणू संसर्ग  आणखी पसरण्याची  भीती देखील वाढत आहे.


याबाबत बोलताना करगणीचे सरपंच गणेश खंदारे म्हणाले, गावातील काही लोकांची   अशी धारणा झाली आहे की, जनता कर्फ्यु ऐच्छिक आहे. त्यामुळे  ग्राम व्यवस्थापन समितीकडे शासनाचे कसलेही जी.आर. आदेश नाहीत. आपण आपली दुकाने भाजीपाला स्टॉल जरी चालू ठेवले तरी काही अडचण येणार नाही. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वनीक्षेपावरून दुकानदार व व्यापारी वर्गाला आणि गावातील ग्रामस्थांना सूचना देण्याचे काम वारंवार सुरु आहे. सरकारी आदेश नसल्यामुळे आम्ही कायदेशीर कार्यवाही करू शकत नाही. जिल्हाधिकारी यांनी  याविषयी प्रशासनाला  आदेश देऊन कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise