भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 23, 2020

भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चाभाजपचा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा


आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त करूनही पक्षाकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने वरिष्ठ नेते एकनाथ भाजप सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तशी चर्चाही सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खडसेंच्या पक्ष प्रवेशावर खुलासा केला. पाटील यांनी कोणतीही अधिक माहिती न देता कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगितले. त्यांच्या प्रवेशावर चर्चा झाली नसल्याचा दावा त्यांनी केला.  


भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. मात्र त्याच्याशी संपर्क केला असता मला अजून काहीच माहिती नाही. माहिती झाल्यावर तुम्हाला कळवितो, असे प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. भाजपवर नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आपली नाराजी व्यक्त केली होती. याचबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यावर थेट आरोप केले होते. अशात आज ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.  


आज राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत महत्वाची बैठक झाली असून यात जळगाव जिल्ह्यातील पक्षाचे मोजके नेते उपस्थित असल्याने या चर्चेला पाठबळ मिळाले आहे. एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही. माहिती झाल्यावर सांगतो, असे सांगितले. अर्थात, सध्या सुरू असणार्यात हालचाली पाहता राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे दिसून येत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


 

No comments:

Post a Comment

Advertise