मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचा फोन करणारा अखेर जेरबंद - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 13, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचा फोन करणारा अखेर जेरबंदमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकीचा फोन करणारा अखेर जेरबंद


मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे भासवून दोन ते सहा सप्टेंबर या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना धमकीचे फोन आले होते.


हे धमकीचे फोन करणारा जेरबंद झाला आहे. या आरोपीचे नाव पलाश बोसला असून तो 49 वर्षाचा आहे. तो कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती समजते.


मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने या आरोपीला कोलकात्यातून अटक केली आहे. हा आरोपी काही वर्षापूर्वी दुबईला होता. त्यामुळे या प्रकरणाचे काही धागेदोरे सापडतात का? याचा तपास सुरु असल्याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली.


या पत्रकार परिषदेत त्यांनी असेही सांगितले की, त्या आरोपीचा संबंध कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही. या आरोपीचा कोणत्या गॅंगशी संबंध आहे का? दुबईत कोणासोबत त्याचे संपर्क आहेत. याबाबत चौकशी सुरु आहे.  असेही एटीएसने सांगितले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise