सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 10, 2020

सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्यासीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीवरील चाचण्या थांबवल्या


पुणे :  येथील सीरम इन्स्टिट्यूटने देशातील कोरोना लसीवरील ट्रायल्स थांबवल्या असल्याची माहिती त्यांनी  निवेदनाद्वारे दिली आहे. निवेदनात म्हंटले आहे की, "आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, अॅवस्ट्रॅजेनेका चाचण्या पुन्हा सुरू करेपर्यंत भारताच्या चाचण्या थांबवित आहोत. आम्ही डीसीजीआयच्या सूचनांचे पालन करीत आहोत. त्यामुळे यापुढे यावर भाष्य करणार नाही. या संदर्भात अधिक माहितीसाठी डीसीजीआयशी संपर्क साधावा.


कोरोना व्हायरसच्या खात्म्यांसाठी सर्वाधिक अपेक्षा वाढवलेल्या ऑक्स फर्डच्या AZD1222 लसीची तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये एका व्यक्तिला ऑक्सवफर्डने बनवलेली कोरोना व्हायरसवरील लस टोचण्यात आली होती. त्याच्या शरारीवर दुष्परिणाम झाल्याचं समोर आलं. यानंतर ही कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise