Type Here to Get Search Results !

भेसळीच्या संशयावरून 8 लाख 50 हजाराहून अधिक किंमतीचा साठा जप्त; वाचा बातमी सविस्तर



भेसळीच्या संशयावरून 8 लाख 50 हजाराहून अधिक किंमतीचा साठा जप्त; वाचा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम

सांगली: अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात येते. तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या अनुषंगाने त्यांच्याविरूध तडजोड प्रकरण दाखल करण्यात येते. अन्न व औषध प्रशासनाने तडजोड प्रकरणी 5 आस्थापनांना एकूण 1 लाख 9 हजार रूपयांचा तडजोड दंड ठोठावला. तसेच खाद्यतेल रिपॅकींग, उत्पादन व विक्री करणाऱ्या 5 आस्थापनांकडून भेसळीच्या संशयावरून 8 लाख 52 हजार 875 रूपये किंमतीचा 7260.4 कि.ग्रॅ. साठा जप्त करण्यात आला. अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांनी दिली. 


स्वच्छतेचा अभाव, लेबलवर माहितीत त्रुटी व विना नोंदणी /परवाना व्यवसाय व इतर त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड प्रकरणे दाखल करण्यात अली होती. तडजोड प्रकरणांमध्ये सुनावनी होऊन मिरज तालुक्यातील मे. हजारे किराणा स्टोअर्स सावळी, मे. वरद कन्फेक्शनरी गवळी गल्ली सांगली, मे. गणेश डिस्ट्रब्युटर्स नेमिनाथनगर सांगली, रोहन उदय सुर्यवंशी वाहन क्र.एमएच 12 जीटी 8866 टाटा झिप सांगली, मे. नवरत्न डिस्ट्रब्युटर्स मार्केटयार्ड सांगली या पेढ्यांना एकूण 1 लाख 9  हजार रूपयांचा तडजोड दंड ठोठावण्यात आला. तसेच खाद्यतेल मोहिमेंतर्गत खाद्यतेल रिपॅकींग, उत्पादन व विक्री करणाऱ्या मे. राजेंद्र ट्रेडर्स ॲन्ड कंपनी, वखार भाग सांगली, मे. वर्षा सेल्प कार्पोरेशन मार्केटयार्ड सांगली, मे. भाग्योदय सेल्स कार्पोरेशन एमआयडीसी कुपवाड, मे श्री वारणा विभाग सह. ग्रा. मंडळ लि. वारणा बझार, शाखा ऐतवडे खुर्द, वाळवा, मे. राधेकृष्ण एक्सट्रॅक्शन प्रा. लि. एमआयडीसी, कुपवाड आस्थापनांची तपासणी करण्यात आली असता या पेढीमध्य जुने वापरलेल्या डब्यांचा वापर होत असल्याचे आढळल्यावरून व भेसळीच्या संशयावरून 8 लाख 52 हजार 875 रूपये किंमतीचा 7260.4 कि.ग्रॅ. साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. चौगुले यांनी सांगितले.


तसेच मे. राजेंद्र ट्रेडींग ॲन्ड कंपनी वखार भाग सांगली, मे. भाग्योदय सेल्स कार्पोरेशन एमआयडीसी कुपवाड, मे परेश इंडस्ट्रज एमआयडीसी कुपवाड, मे. देव स्वीटस शामरावनगर, सांगली, मे. पाकिजा स्वीटस सांगली या पेढींना तपासणी अहवालामध्ये त्रुटी आढळल्याने व्यवसाय बंद नोटीस देण्यात आल्या असल्याचेही श्री. चौगुले यांनी सांगितले.


ही कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पी. पी. फावडे, एस. ए. केदार, आर. एल. महाजर, श्रीमती हिरेमठ व द. ह. कोळी यांनी केली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies