आजपासून आटपाडीत किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्ड वेअर दुकाने सुरु - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

आजपासून आटपाडीत किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्ड वेअर दुकाने सुरुआजपासून आटपाडीत किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्ड वेअर दुकाने सुरु

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये दिनांक १९ सप्टेंबर जनता कर्फ्यू असला तरी आजपासून किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्ड वेअर दुकाने सुरु राहणार असल्याची माहिती आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी दिली.


आटपाडी शहरामध्ये कोरोना संसर्गजन्य विषाणूचा मोठ्या प्रमाणात फैलाव सुरु आहे. मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोना या संसर्गजन्य विषाणूची साखळी तोडण्यासाठी आटपाडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.

 

आटपाडी शहरामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती, सर्व पक्षीय नेते, व्यापारी, ग्रामस्थ यांच्या बैठकीमध्ये ठरल्या प्रमाणे दिनांक ९ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर  वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येवून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


परंतु या या बंद कालावधीमध्ये सोमवार दिनांक १४ सप्टेंबर पासून सकाळी ९ ते ५ यावेळेत किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्ड वेअर दुकाने चालू राहतील असे सर्वानुमते ठरविण्यात आले होते. त्यानुसार आजपासून किराणामाल, फळे विक्री, मांस विक्री, शेती उद्योग, हार्ड वेअर ही सर्व दुकाने सुरु राहणार आहेत.


जरी ही सर्व दुकाने चालू राहणार असली तरी काम असेल तरच घराबाहेर पडा, नेहमी मास्क चा वापर करा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, घरी राहा सुरक्षित रहा असे आवाहन आटपाडीच्या सरपंच सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

 


No comments:

Post a Comment

Advertise