शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात ; योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे झाल्याची प्रतिक्रिया - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 28, 2020

शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात ; योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे झाल्याची प्रतिक्रियाशालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची कोरोनावर मात ; योग्य उपचार आणि जनतेच्या शुभेच्छांमुळे लवकर बरे झाल्याची प्रतिक्रिया


मुंबई : शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. जनतेचे प्रेम व सर्वांच्या शुभेच्छांबरोबरच या काळात योग्य आहार, योग, प्राणायाम, ध्यानधारणा आणि वाचन यामुळे लवकर बरे होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

मराठवाडा मुक्ती दिन कार्यक्रमानिमित्ताने दि. १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत त्या नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होत्या. या दरम्यान त्यांना संसर्ग झाला. २१ सप्टेंबर रोजी त्यांना ताप आल्यामुळे कोविड-१९ ची टेस्ट करुन घेतली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल होऊन औषधोपचार घेतले. दि. २८ सप्टेंबर रोजी त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

कोविड -१९ चे निदान झाल्यानंतर योग्य ते उपचार घ्यावेत, सकारात्मक भावना ठेऊन ध्यानधारणा करावी. तसेच आपल्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन प्रा. गायकवाड यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise