सांगलीचे एसपी सुहेल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

सांगलीचे एसपी सुहेल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

 


सांगलीचे एसपी सुहेल शर्मा कोरोना पॉझिटिव्ह

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली होती. मेपासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अधीक्षक शर्मा जिल्हाभर फिरत होते. पोलिस दलाला कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. ते स्वतःही काळजी घेत होते. सध्या त्यांना घरातच अलगीकरण करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise