आटपाडीत वाळू तस्करी करण्याऱ्यावर प्रशासनाकडून गुन्हे दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

आटपाडीत वाळू तस्करी करण्याऱ्यावर प्रशासनाकडून गुन्हे दाखलआटपाडीत वाळू तस्करी करण्याऱ्यावर प्रशासनाकडून गुन्हे दाखल 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरु असून अगदी गावालगतची वाळू सुद्धा वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात घेवून जात असल्याने आटपाडीतील शुक्र ओढ्याच्या पात्रात मोठ-मोठे खड्डे पडले असून याबाबत महसूलच्या वतीने आटपाडीचे गाव कामगार तलाठी सुधाकर केंगार यांनी अज्ञात वाळू तस्करांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल केले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, दि.09.09.2020 रोजी दुपारी 01.00 वाचे सुमारास गाव कामगार तलाठी सुधाकर केंगार व कोतवाल आटपाडी दिलावर बाबुराव मुलाणी आटपाडी तहसील कार्यालय येथुन आटपाडी मार्केट यार्डसमोरुन आटपाडी एस टी स्टॅडकडे जात असताना आटपाडी आढापात्राजवळील लोहार यांचे घरापासुन थेाडया अंतरावर दक्षिणेस शासकीय आढापात्रात एका ठिकाणी खडडा पाडलेला दिसला.  


सदर ठिकाणची सुमारे 10 ब्रास वाळु कोणीतरी अज्ञात इसमाने वाळु विनापरवाना मुददाम लबाडीने उत्खनन करुन चोरुन नेलेचे खात्री झालने पंचनामा करून अंदाजे दीड लाख रुपये किंमतीची सुमारे १० ब्रास वाळु  तस्करांनी चोरुन नेली आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise