रविकिरण जावीर यांच्या ‘मद; लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात अंतिम फेरीत धडक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 3, 2020

रविकिरण जावीर यांच्या ‘मद; लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात अंतिम फेरीत धडकरविकिरण जावीर यांच्या ‘मद; लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात अंतिम फेरीत धडक

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी :  पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव 2020 मध्ये अंतिम 47 लघुपटांमध्ये रविकिरण जावीर यांच्या मद (द लिकर) लघुपटाची वर्णी लागली आहे. या लघुपट स्पर्धेमध्ये जगभरातील जवळपास 400 लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेसाठी सहभागी झाले आहेत. त्यातुन अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या निवडक भारतीय 28 व आंतरराष्ट्रीय 19 असे एकूण 47 लघुपट ऑनलाईन ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव या युट्यूब” चॅनेलच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवले जाणार आहेत.


रविकिरण जावीर यांनी लेखन, दिग्दर्शन केलेला व स्वतः अभिनय केलेला मद (द लिकर) लघुपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकणार ही बाब माणदेशासाठी व आटपाडी तालुक्यासाठी अतिशय गौरवशाली आहे. दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी 4 वाजून 15 मिनिटांनी हा लघुपट सर्व रसिक प्रेक्षकांसाठी युट्यूबवर प्रसारित केला जाणार आहे.


या लघुपटामध्ये अनिषा जावीर, प्रिती भिसे, कुंडलिक केंगार, अर्थ जावीर, पार्थ जावीर, प्रतीक जाधव, राजेंद्र पुजारी, गजेंद्र यादव आणि रविकिरण जावीर यांनी भूमिका केल्या आहेत. चित्रण योगेश स्वामी, रुपेश केंगार, संकलन ऋषिकेश स्वामी तर पार्श्वसंगीत समाधान ऐवळे (बोधी साऊंड) यांनी दिले आहे. 


याच टिमकडून सध्या माणदेश एक्सप्रेस फिल्म्सच्या माध्यमातून “बोंबाची बाराखडी” ही वेबसिरीज सुरू असून त्यामध्ये रविकिरण जावीर हे अभिनयासो बतच लेखन व दिग्दर्शन करीत आहेत. 

त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात अंतिम 47 लघुपटांमध्ये निवड झाल्याने सर्व कलाकार, तंत्रज्ञ व रविकिरण जावीर यांचे कौतुक होत आहे, तर अंतिम निवडीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise