अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घरांची व पिकांची सभापतीकडून पाहणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 22, 2020

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या घरांची व पिकांची सभापतीकडून पाहणीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या घरांची व पिकांची सभापतीकडून पाहणी 

माणदेश एक्सप्रेस टीम


अजनाळे/सचिन धांडोरे : य. मंगेवाडी गावात मुसळधार पडलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेती पिके, फळबागा व नागरिकांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेकांचे कुटुंब उघड्यावर आली असून महसूल प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे अशी मागणी सांगोला पंचायत समितीच्या सभापती राणीताई कोळवले यांनी केली आहे.  
सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी सभापती  राणीताई कोळवले व उपसभापती तानाजी चंदनशिवे यांनी य.मंगेवाडी गावाला भेट देऊन येथील लक्ष्मीप गोविंद काटे यांच्या घराची पडझड झालेल्या  घराची पाहणी करून  तात्काळ शासनाकडून  आर्थिक मदत  मिळवून देण्याच्या दृष्टीने  प्रयत्न केला जाईल असा  विश्वास दिला. घराची भिंत पडल्यामुळे लक्ष्मीबाई यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू देखील मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.  


कमलापूर येथील तंडे मळा येथे भेट देऊन मका व डाळिंब बागेची झालेल्या नुकसानाची पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामा करून त्यांना मदत करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाणार असल्याच्या त्या म्हणाल्या. गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगोला तालुक्यातील सर्वच गावांमध्ये शेतीपिकांसह व  घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.  


प्रा.बाळकृष्ण कोकरे, विशाल काटे, दत्तात्रय तंडे, पांडुरंग अनुसे, निवृत्ती अनुसे, दत्तात्रय वाघमारे, भीमराव वाघमारे, महादेव घुटुकडे, शिवाजी घुटुकडे, किसन तंडे, संभाजी खटके, तुकाराम काळे, सौदागर काळे, राहुल काळे, सखुबाई खंडागळे, सिद्धेश्वर तंडे, बाळासो तंडे, अण्णासो तंडे, मारुती टाकळे, हरी मेटकरी, बापू तंडे, नानासो तंडे, मधुकर तंडे, वरील शेतकऱ्यांच्या मका व डाळिंब बागेची झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी सर्वपरी मदत करणार असल्याचे राणीताई कोळवले शेतकऱ्यांना आश्वासन दिले. त्यानंतर कमलापूर ग्रामपंचायतीला भेट घेऊन कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेतली व त्यासंदर्भात प्रशासनाला सक्त सूचना देण्यात आल्या. याप्रसंगी  गडदे ग्रामसेवक,  डॉ. तंडे यांच्यासह  य.मंगेवाडी व कमलापूर ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise