रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान ; शिवसेना नेत्याची जहरी टिका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

रामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान ; शिवसेना नेत्याची जहरी टिकारामदास आठवले हे अर्धे शटर बंद झालेले दुकान ; शिवसेना नेत्याची जहरी टिका


मुंबई : सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रणौतची भेट घेत शिवसेनेवर निशाणा साधला होता. मात्र, नंतर त्यांनी महाराष्ट्रात थेट राष्ट्रपती राजवटी लागू करण्याची मागणी केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  


गुंडागर्दी करणं शिवसेनेची जुनी सवय आहे आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यावरून शिवसेना प्रवक्ते अनिल परब यांनी रामदास आठवले यांची खिल्ली उडवली आहे. रामदास आठवले हे “अर्धे शटर बंद झालेलं दुकान आहे”, अशा शब्दांत अनिल परब यांनी आठवले यांचा समाचार घेतला.


अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेतील वाद चांगलाच पेटला असताना रिपब्लिकन पक्ष तिला सुरक्षा देईल, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. तर कंगना मुंबईत आल्यानंतर रामदास आठवलेंनी तिची भेट घेतली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise