आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव भरल्याने शेतकरी सुखावला ; सांडव्यावरून पाणी लागले वाहू - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 12, 2020

आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव भरल्याने शेतकरी सुखावला ; सांडव्यावरून पाणी लागले वाहूआटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव भरल्याने शेतकरी सुखावला ; सांडव्यावरून पाणी लागले वाहू 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील सर्वात मोठा तलाव असलेला राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन “राजेवाडी तलाव” यावर्षी पूर्ण क्षमतेने भरला आहे. शुक्रवारी राजेवाडी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.


राजेवाडी येथील तलावाची सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिश राणी व्हीक्टोरिया हिने तलावाची निर्मिती केली होती. परंतु पुरेशा पावसाअभावी 2011 ते 2019 पर्यंत हा तलाव पाण्याअभावी कोरडा ठणठणीत होता. ऑक्टोंबर 2019 उरमोडी योजनेचे पाणी वाहू लागले व त्याचवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. या तलावाचा पाणीसाठा हा सातारा जिल्ह्यात होतो. तर तलावाची मुख्य भिंत ही सांगली जिल्ह्यात येतो. सातारा जिल्ह्यात पाणीसाठा व सांगली जिल्ह्यात मुख्य भिंत असली तरी या पाण्याचा सवात जास्त फायदा हा सोलापूर जिल्ह्यातील गावांना होतो. तलावाला उजवा व डावा असे दोन आहेत. डाव्या कालव्यातून पाणी सोलापूर जिल्ह्याकडे वाहत जाते असले तरी हा कालवा भुयारी असल्याने याचा फायदा सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कमी प्रमाणात होतो. आटपाडी तालुका कडे येणाऱ्या डाव्या कालव्याचे काम अजूनही अपूर्णच असून सातारा जिल्ह्यातील पळसावडे गावापर्यंत कालव्याच्या खुदाईचे अर्थवट काम झाले आहे.


तालुक्यामध्ये शुक्राचारी येथील पर्यटन स्थळ सोडले पर्यटन स्थळ नव्हते. परंतु मागील वर्षी तलाव्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याने या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तर होणारी गर्दी पाहता या ठिकाणी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी भेट देवून तलावाची पाहणी करून प्रशासनाला तलावाच्या आसपास असणारी चिलारीची संपूर्ण झाडे काढण्यास लावली होती. त्यामुळे आटपाडी तालुक्यासह सातारा, सोलापूर जिल्हा हद्दीवरील अनेक गावांच्या नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव यावर्षीदेखील पूर्ण क्षमतेने भरला आहे. शुक्रवारी राजेवाडी तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे .मागील वर्षी देखील राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. सलग दुसऱ्या वर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.


सुमारे 150 वर्षांपूर्वी ब्रिटिश राणी व्हीक्टोरिया यांनी या तलावाची निर्मिती केली होती. 2011 ते 2019 हा तलाव पाण्याअभावी कोरडा ठणठणीत होता .त्यानंतर ऑक्टोंबर 2019 मध्ये तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. व यावर्षीदेखील निसर्गाच्या कृपेने राजेवाडी येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. या तलावाचे पात्र सातारा जिल्ह्यात येते व याचा सांडवा हा सांगली जिल्ह्यात येतो. तर पाण्याचा वापर हा सोलापूर जिल्ह्यातील बरेच या गावांना होतो. तलावाला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत .यापैकी सोलापूर जिल्ह्याकडे जाणाऱ्या उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. तर आटपाडी तालुका कडे येणाऱ्या डाव्या कालव्याचे काम अजूनही अपूर्णच आहे.


मागील वर्षी दहा वर्षांनी तलाव भरल्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होती. एखाद्या पर्यटन स्थळाचे स्वरूप यावेळी आले होते .आटपाडी तालुक्यासह सातारा, सोलापूर जिल्हा हद्दीवरील अनेक गावांच्या नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती. तलाव भरल्यानंतर सांडव्यावरून वाहणारे पाणी धबधब्यासारखे पडत असल्याने अनेक लोक या ठिकाणी पर्यटनासाठी येतात.  


राजेवाडी चा तलाव हा ब्रिटीशकालीन असल्याने तलावाची इतिहासात नोंद आहे. त्यामुळे राजेवाडी तलावाची वेगळी ओळख आहे. सलग दुसऱ्या वर्षी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सदर परिसरातील या तलावावर वर अवलंबून असणारा परीसरातील शेतकरी राजा मात्र सर्वात सुखी झाला आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise