आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 10, 2020

आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे निधनआरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे निधन

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आरपीआयचे सांगली जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे ह्र्दयविकराच्या तीव्र धक्याने आज दिनांक १० रोजी निधन झाले.


बाबासाहेब कांबळे हे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी खानापूर तालुक्यात आरपीआयचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार करून अनेक युवा कार्यकर्ते तयार केले होते. ज्या ठिकाणी अन्याय-अत्याचार होत असेल त्या ठिकाणी जावून तेथील लोकांना धीर देवून प्रसंगी सरकारच्या विरोधात आंदोलने करून गोर-गरिबांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.


 अलीकडे त्यांची त्यांची तब्येत त्यांना साध देत नव्हती. तरीसुद्धा त्यांनी दिनांक ७ रोजी कडेगाव येथे बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस याला अटक झाली पाहिजे म्हणून त्यांनी मोर्चा काढून आंदोलन केले होते.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise