रिपाई देणार कंगनाला संरक्षण : रामदास आठवले - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 4, 2020

रिपाई देणार कंगनाला संरक्षण : रामदास आठवलेरिपाई देणार कंगनाला संरक्षण : रामदास आठवले  


मुंबई  :  मुंबईत येणाऱ्या  कंगना  रणौतला कुणी अडवलं तर रिपाई कंगनाला  संरक्षण देईल असा इशारा  केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. कंगनाच्या वक्तव्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच  ढवळून निघाले आहे.


लोकशाहीत प्रत्येकाला  टीका टिप्पणी करण्याचा’अधिकार आहे. कंगनाने राज्यसरकारवर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत  राहण्याचा अधिकार  नाही, अशी भूमिका घेणे लोकशाहीच्या विरोधात आहे.  


साविंधानाने दिलेल्या अधिकारानुसार कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार आहे, तिला विरोध केला तर रिपाई तिला संरक्षण देईल असे आठवले म्हणाले आहेत.

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. तिने मुंबईत येऊ नये अशी मागणीही करण्यात येत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise