कोव्हिड रुग्णासाठी ऑक्सिजनच्या मशीन भेट ; अनिल (शेठ) पाटील व सहकाऱ्यांचा पुढाकार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 27, 2020

कोव्हिड रुग्णासाठी ऑक्सिजनच्या मशीन भेट ; अनिल (शेठ) पाटील व सहकाऱ्यांचा पुढाकारकोव्हिड रुग्णासाठी ऑक्सिजनच्या मशीन भेट ; अनिल (शेठ) पाटील व सहकाऱ्यांचा पुढाकार

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : सिद्धिविनायक समूहाचे अध्यक्ष व युवा नेते अनिल (शेठ) पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्र व खानापूर तालुक्यातील एक रुग्णालय अशा कोविड  रुग्णासाठी ऑक्सिजनच्या मशीन भेट देण्यात आल्या.


मुंबई आयकर आयुक्त सचिन मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल (शेठ) पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑक्सीजन मशीन साठी आर्थिक सहकार्य केले. आटपाडी, दिघंची, करगणी, खरसुंडी, खानापूर या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सीजन मशीन चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास अनिल पाटील, युवा उद्योजक विनायक मासाळ, अक्षय अर्जुन, बंडू कातुरे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील, जांभुळणीचे माजी सरपंच महादेव जुगदर, किरण पवार, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उमाकांत कदम, डॉ.विनायक पवार, संदीप घोरपडे, पांडुरंग शिंदे, बाबुराव मगर यांची प्रमुख उपस्थिती होती.


आटपाडी तालुक्यात कोरोना रुग्णांचा संसर्ग वाढत आहे. कोविड  रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आटपाडीत शंभर बेडचे नवीन रुग्णालय चार दिवसात सुरू करण्यात येणार आहे. सामान्य लोकांना रुग्णालयातील खर्च परवडत नाही. त्यामुळे लोकवर्गणीतून ऑक्सीजन मशीन, व्हेंटिलेटर, ईसीजी मशीन, सिटीस्कॅन मशिन, औषध व रुग्णवाहिका आदी उपलब्धता करून केल्यास आटपाडीत तालुक्यातील लोकांना दिलासा मिळेल व कोरोणावर  मात करता येऊ शकेल असा विश्वास आयकर आयुक्त डॉ सचिन मोटे व संयोजकांनी व्यक्त केला.


गलाई बांधवांनी या कामासाठी सहकार्य केल्याची भावना अनिल (शेठ) पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. प्राथमिक आरोग्य केंद्रास ऑक्सीजन मशीन भेट देऊन रुग्णांची सोय करण्यात आल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी यांनी संयोजकांचे आभार मानले.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise