रामदास आठवलेंना कुणी गांभीर्यानं घेत नाही ; शरद पवार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 30, 2020

रामदास आठवलेंना कुणी गांभीर्यानं घेत नाही ; शरद पवाररामदास आठवलेंना कुणी गांभीर्यानं घेत नाही ; शरद पवार


मुंबई : आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार व खासदार नाही. त्यांचे बोलणे बाहेर व सभागृहात ही गांभीर्याने घेतले जात नाही असा टोला लगावला. तर खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही.  


देशाचे लक्ष इतर ठिकाणी वळविण्यासाठी केंद्र सरकारने विविध संस्था अभिनेता सुशांतसिंग रजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी लावल्या होत्या. मात्र त्यांचा तपास इतर दिशेने सुरू असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. तसेच खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे व छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
No comments:

Post a Comment

Advertise