कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम कोरोना "पॉझिटीव्ह' - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम कोरोना "पॉझिटीव्ह'कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम कोरोना "पॉझिटीव्ह'

माणदेश एक्सप्रेस टीम


कडेगाव :  राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचा कोरोना चाचणी अहवाल "पॉझिटीव्ह' आला आला असून याबाबत त्यांनी स्वत: फेसबुक "पोस्ट' वरून स्वत:च ही माहिती दिली असून दोन-तीन दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.


जिल्ह्यात अनेक राजकीय नेते मंडळी कोरोना बाधित झाली आहे. यामध्ये  खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार सुमन पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार मोहनराव कदम, आमदार गोपीचंद पडळकर हे यापूर्वी बाधित झाले आहेत. तसेच माजी आमदार संभाजी पवार, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील हे देखील बाधित झाले होते.

 

राज्यमंत्री डॉ. कदम यांना थोडा ताप आणि अंगदुखी अशी सौम्य लक्षणे दिसू लागली होती. त्यामुळे कालच त्यांनी चाचणी करून घेतली. त्याचा अहवाल आज "पॉझिटीव्ह'आला आहे. डॉ. कदम यांनी फेसबुक पोस्टवरून "कोरोना' बाधित झाल्याची माहिती दिली आहे. मतदार संघातील विविध योजनांचा पाठपुरावा, मंत्रालयातील बैठका तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने पूरपरिस्थितीचा दौरा, भारती विद्यापीठाचे कामकाज अशा धावपळीत वैद्यकीय खबरदारी घेतली. तरीही कोरोना संसर्ग झाल्याचे डॉ. कदम म्हणाले.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise