4 लाख 16 हजार 170 रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त ; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 24, 2020

4 लाख 16 हजार 170 रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त ; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई4 लाख 16 हजार 170 रुपयांचे दुध व दुग्धजन्य पदार्थ जप्त ; अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई  


 सांगली, दि. 24 : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत एरंडोली ता. मिरज येथील सुर्यप्रकाश दुध संकलन केंद्र व मे. पाटील मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्टर या ठिकाणी धाडी टाकुन कारवाई करण्यात आली. यामध्ये मे पाटील मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्ट, गट नं 1529 एरंडोली ता. मिरज या ठिकाणी म्हैस दुध व गाय दुध यांचे संकलन करुन त्यावर प्रक्रिया केले जात असल्याचे आढळले, सदर ठिकाणी दुधात भेसळ करण्यासाठी दुध पावडर व ट्रायसोडियम सायट्रेट वापरत असल्याचा संशय आल्याने रुपये 4 लाख 16 हजार 170 रुपये किंमतीचा 1000 लिटर म्हैसचे दुध, 515 लिटर गायचे दुध  तसेच 2123 किग्रॅ दुध पावडर, 30 किग्रॅ ट्रायसोडियम सायट्रेटचा साठा जप्त करण्यात आला दुध नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आले. मे पाटील मिल्क ॲड मिल्क प्रॉडक्टस, एरंडोली या डेअरीमध्युन म्हैस दुध, गाय दुध,खवा, पनीर, दुध पावडर व ट्रायसोडियम सायट्रेट यांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांचे प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झालयानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सु. आ. चौगुले यांनी दिली.  


मे. सुर्यप्रकाश दुध संकलन केंद्र, एरंडोली या ठिकाणी म्हैस दुध, गाय दुध यांचे नमुने तपासणीसाठी घेतले असुन त्यांचे प्रयोगशाळेकडुन अहवाल प्राप्त झालयानंतर त्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.  


सदर ठिकाणी वाहनांतुन दुध संकलन केले जाते अशा वाहनांना परवाना/नोंदणी घेणे आवश्यक आहे. ज्यांनी परवाना/नोंदणी घेतलेली नाही त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येत आहे. सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुकत श्री सुरेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे, श्री महाजन व नमुना सहायक श्री. कावळे यांनी केली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise