Type Here to Get Search Results !

नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांचे विटेकरांना आवाहन ; काय म्हणाल्या प्रतिभाताई वाचा सविस्तर



नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांचे विटेकरांना आवाहन ; काय म्हणाल्या प्रतिभाताई वाचा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


विटा : सप्रेम नमस्कार, कोरोनाजागतीक महामारीने संपुर्ण जग हतबल झाले असताना आपण आपले शहर गेल्या चार माहिन्यापर्यंत कोरोनापासून बऱ्यापैकी मुक्त ठेऊ शकलो होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासुन आपल्या शहरात कोरोनाचा प्रसार गतीने होत आहे व कोरोनाबाधीतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील अनेक परिवारांना, घरचा सदस्य बाधित झाल्याने मोठ्या शारीरीक,मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.  


ज्यांच्या घरी कोरोनाबाधीत सदस्य आहे त्यांच्याशी बोलल्यावर कोरोनाचे गांभीर्य लक्षात येते. अशा कुटुंबामध्ये प्रचंड भिती व अस्वस्थता जाणवत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्यसेवा उपलब्ध होणे देखील मुश्किलीचे झाले आहे. या सर्व गंभिर परिस्थितीचा विचार करता, आता आपणा सर्वांची जबाबदारी खुप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.


शासन,प्रशासन,सेवाभवी संस्था,सामाजीक कार्यकर्ते यांनी या पाच महिन्यामध्ये आपण काय करावे,काय करु नये व आपली जिवनशैली कशी असावी या बाबत भरपुर प्रबोधन केले आहे. आता यापुढे आपणाला इतर कोणी कसे वागायचे हे सांगण्याची वेळ येऊ न देता आपणच सर्वांनी आपल्या शहराच्या सुरक्षीततेसाठी प्रशासनाने घालुन दिलेले सर्व नियम पाळावेत हे नम्र आवाहन विट्याची प्रथम नागरीक या नात्याने आपणां सर्वांना करीत आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies