माण देशी फाऊंडेशन व माण देशी चॅम्पियन्स तर्फे सातारा जिल्हयासाठी ४५ लाख रुपये किमतीचे पीपीई किट,सॅनिटाईझर, ऑक्सी मीटर प्रदान तर म्हसवड आरोग्य केंद्रास दोन हजार अँटिजन टेस्ट किट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

माण देशी फाऊंडेशन व माण देशी चॅम्पियन्स तर्फे सातारा जिल्हयासाठी ४५ लाख रुपये किमतीचे पीपीई किट,सॅनिटाईझर, ऑक्सी मीटर प्रदान तर म्हसवड आरोग्य केंद्रास दोन हजार अँटिजन टेस्ट किटमाण देशी फाऊंडेशन व माण देशी चॅम्पियन्स तर्फे सातारा जिल्हयासाठी ४५ लाख रुपये किमतीचे पीपीई किट,सॅनिटाईझर, ऑक्सी मीटर प्रदान तर म्हसवड आरोग्य केंद्रास दोन हजार अँटिजन टेस्ट किट

माणदेश एक्सप्रेस टीम


म्हसवड/अहमद मुल्ला : माण व खटाव तालुक्यात रोजच कोरोना बाधित रुग्णांची वाढु लागल्यामुळे संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास दोन हजार अँटिजन टेस्ट किट व सातारा जिल्हयासाठीही ४५ लाख रुपये किमतीचे पीपीई किट,सॅनिटाईझर, ऑक्सी मीटर माण देशी फाऊंडेशन व माणदेशी चॅम्पियन्स तर्फे मोफत ऊपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माणदेशी फाऊंडेशच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी दिली.  


सध्या जिह्यात व म्हसवड शहर व परिसरात बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे म्हसवड शहरातच बाधितांची संख्या ३०० च्या पुढे गेली असुन रोजच बाधित रुग्ण सापडून येत आहेत. यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केद्रामार्फत  शहरात नऊ ठिकाणी रॅपीट कॅम्प लावुन संशयित नागरिकांच्या घशातील स्त्रावाचे नमूने तपासणीसाठी घेण्यास  व संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनने उपलब्ध करुन दिलेले अँटिजन टेस्ट किट उपयोगी पडत आहेत.


नागरिकांनी स्वत: व स्वत:चे कुटुंबासह लगतच्या कुटंबांच्या आरोग्याच्या सुरक्षतेसाठी स्वयंफूर्तीने कोरोना साथीच्या प्रादुर्भावाची तपासणी करुन आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन श्रीमती चेतना सिन्हा व प्रभात सिन्हा यांनी केले आहे.No comments:

Post a Comment

Advertise