शिवेंद्रसिंहराजे यांचा आदर्श इतर आमदार घेणार का? : सातारकरांसाठी स्व: खर्चाने उभारले कोविड हॉस्पिटल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

शिवेंद्रसिंहराजे यांचा आदर्श इतर आमदार घेणार का? : सातारकरांसाठी स्व: खर्चाने उभारले कोविड हॉस्पिटलशिवेंद्रसिंहराजे यांचा आदर्श इतर आमदार घेणार का? : सातारकरांसाठी स्व: खर्चाने उभारले कोविड हॉस्पिटल


सातारा :  कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आरोग्य विषयक यंत्रणा राबवण्यासाठी प्रशासनाला खूप वेळ लागत असल्याने भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक पाऊल पुढे टाकत स्वखर्चातून त्यांच्या पुष्कर मंगल कार्यालयात ८० बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारले आहे.


या हॉस्पिटलमध्ये ४० ऑक्सिजनसह बेड तसेच ४० जनरल बेड उपलब्ध असतील. येत्या एक दोन दिवसांत या हॉस्पिटलचे उद्‌घाटन होणार असून ते जिल्हाधिकऱ्यांकडे सुपूर्द केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना रूग्णांना येथे उपचार घेता येणार आहेत.


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आकडा १७ हजार ६६३ वर पोहोचला असून उपचाराअभावी अनेकांचा मृत्यूही झाला आहे. सध्या सात हजार ४२७ रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत आहेत. तर ४६२ रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात शासकिय व खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेले बेड कमी पडू लागले आहेत.


चारशे ते पाचशे रूग्णांवर उपचार करण्यासाठीचे कोविड हॉस्पिटल होणार आहे. पण त्याला आणखी महिना तरी लागणार आहे. बेड अभावी रूग्णांची होणारी परवड व त्यातून वाढलेले मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी किमान रूग्णांना बेड उपलब्ध होऊन तातडीने उपचार मिळावेत,यासाठी भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise