कोविड रूग्णांना मार्गदर्शन व समुपदेशनासाठी टेलिमेडीसीन कक्ष सुरू ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

कोविड रूग्णांना मार्गदर्शन व समुपदेशनासाठी टेलिमेडीसीन कक्ष सुरू ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीकोविड रूग्णांना मार्गदर्शन व समुपदेशनासाठी टेलिमेडीसीन कक्ष सुरू ; जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : कोविड-19 संसर्ग झालेल्या रूग्णांना मार्गदर्शन, त्यांच्या शंकांचे निरसन व समुपदेशनासाठी जिल्हा परिषद सांगली येथे टेलिमेडीसीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या सुविधेचा रूग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, टेलिमेडीसीन कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2375100 व 0233-2375300 असून या कक्षामध्ये  वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अधिक्षक व आंतरवासीता यांची प्रत्येकी 2 पदे कार्यरत करण्यात आली आहेत.  


या कक्षामार्फत कोविड-19 संसर्ग झालेल्या रूग्णांचा कॉल सुरू झाल्यानंतर त्यांच्या लक्षणावरून गृह अलगीकरण अथवा संस्था अलगीकरण बाबत मार्गदर्शन करण्यात येईल. रूग्णांचे औषधोपचार व इतर शंकांचे निरसन करण्यात येईल. रूग्णांचे समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार दिला जाईल. येणाऱ्या फोन कॉलची नोंद घेऊन संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राना सुचना देण्यात येईल.


No comments:

Post a Comment

Advertise