आमदार अनिलभाऊ बाबर कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

आमदार अनिलभाऊ बाबर कोरोना पॉझिटिव्हआमदार अनिलभाऊ बाबर कोरोना पॉझिटिव्ह

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : खानापुर मतदार संघामध्ये आज आजी माजी आमदार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मतदार संघाला मध्ये खळबळ माजली आहे.


आज दुपारी आटपाडी तालुक्याचे नेते व खानापुर-आटपाडी मतदार संघाचे माजी आमदार राजेंद्रआण्णा यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. तर आज सायंकाळी विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मतदार संघामध्ये खळबळ उडाली आहे.


याबाबत सुहास बाबर म्हणाले, आमदार अनिलभाऊ बाबर यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.  गेल्या काही दिवसांत भाऊंच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती आहे. भाऊंची प्रकृती चांगली असुन ते घरीच उपचार घेणार आहेत.


आपणा सर्वांना माहीत आहेच कोरोनाच्या काळात भाऊंनी प्रकृतीची तमा न बाळगता आलेल्या संकटावर मात करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा नव्या जोमाने कार्यरत राहतील. आपले आशीर्वाद, प्रेम, व सदिच्छा पाठीशी राहाव्यात असे आवाहन केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise