कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त ट्वीट… मुंबईत येण्यापासून थांबवून दाखवा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 4, 2020

कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त ट्वीट… मुंबईत येण्यापासून थांबवून दाखवा


कंगना रणौतचे पुन्हा वादग्रस्त ट्वीट… मुंबईत येण्यापासून थांबवून दाखवा


मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा ट्वीट करून वाद निर्माण आहे. या ट्वीटमध्ये तिने आपण मुंबईत येणार असल्याचं सांगत कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे आवाहनच दिले आहे.


कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. यानंतर सोशल मीडियावर सामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांनी टीका केली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप तिने केला होता.


दरम्यान तिला इतका वाढता विरोध पाहता, आता तिने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये तिने ‘बरेच लोकं मला मुंबईत परत येऊ नकोस अशी धमकी देत आहेत. म्हणून मी येत्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेन तेव्हा पोस्ट करेन. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर थांबून दाखवा’ या आशयाचे ट्विट कंगनाने केले असल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise