शिक्षण संस्थाचालकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : सांगोला शिक्षण संस्था चालक संघटना आक्रमक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, September 20, 2020

शिक्षण संस्थाचालकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : सांगोला शिक्षण संस्था चालक संघटना आक्रमकशिक्षण संस्थाचालकांवरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही : सांगोला शिक्षण संस्था चालक संघटना आक्रमक 

माणदेश एक्सप्रेस टीम  


सांगोला : शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून वारंवार वेगवेगळे शिक्षण संस्थाच्या हिता विरुद्ध परिपत्रक काढून शिक्षण संस्था मोडीत काढण्याचा डाव व अन्याय खपवून घेतला जाणार नाही असा असा इशारा सांगोला तालुका शिक्षण संस्थाचालक यांच्या बैठकीत सरकारला देण्यात आला.


सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेत रविवारी तालुक्यातील सर्वच शिक्षण संस्था चालक यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. कोरोनाच्या महामारी मुळे ही सभा सामाजिक अंतर राखत, सर्वानी मास्क लावून पार पडली.


या सभेत इयत्ता पाचवीचे वर्ग यापुढील काळात प्राथमिक शाळेला जोडण्यास सर्व संस्थाचालकानी विरोध दर्शवला. शासन निर्णय यापुढील काळात घेणार असेल तर संस्थाचालक कायदेशीर मार्गाने लढाई करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत असे मत सुभाष लऊळकर, प्रभाकरकाका चांदणे, अशोक बनसोडे, म.शा.घोंगडे, रावसाहेब पाटील, निळकंठ शिंदे यांनी व्यक्त केले. 2012 पासूनची शिक्षक भरती बंदी उठवावी, नवीन शिक्षक, शिक्षकेतर भरती तत्काळ करावी, थकित वेतनेतर अनुदान द्यावे या सर्व प्रश्नांचा निवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरले.  


सभेचे प्रास्ताविक व संस्थाचालकांच्या अनेक प्रलंबित मागणी बाबतचे मनोगत रमेश येडगे यांनी केले. सूत्रसंचालन निळकंठ शिंदे यांनी केले. यावेळी डॉ सुधाकर कांबळे, गुलाबराव बाबर यांचे सह अनेक शिक्षण संस्था चालक या सभेला उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise