आयकर आयुक्त सचिन मोटे धावले शेतकरी बांधवांच्या मदतीला ; आटपाडी पश्चिम भागात शेतकऱ्यांना आधार - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

आयकर आयुक्त सचिन मोटे धावले शेतकरी बांधवांच्या मदतीला ; आटपाडी पश्चिम भागात शेतकऱ्यांना आधारआयकर आयुक्त सचिन मोटे धावले शेतकरी बांधवांच्या मदतीला ; आटपाडी पश्चिम भागात शेतकऱ्यांना आधार

माणदेश एक्सप्रेस टीम


निंबवडे/राघव मेटकरी : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सांगली जिल्ह्यातील आटपाडी पश्चिम भागातून प्रा.एन.पी.खरजे व द्राक्ष बागायतदार शिष्टमंडळ यांनी भागातील सुपुत्र आयकर आयुक्त यांची भेट घेतली. त्यावेळी शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. कोरोनामुळे अगोदरच  शेतकरी बांधवांचे बरेच नुकसान झाले आहे. द्राक्ष व तर बागायतदार यांचे मागील पिकांचे नुकसान होऊन देखील नवीन पीक उभारणी पर्यंत त्यांना अजूनही पीक विम्याचा कोणताही फायदा मिळाला नव्हता.  


बरेच शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन पीक लागवडीसाठी जुळवाजुळव करीत होते. परंतु सचिन मोटे शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तात्काळ जिल्हा कृषी विभागाला व जिल्हा प्रशासनाबरोबर शेतकरी बांधवांच्या सर्व प्रश्नांची चर्चा केली आणि पाठपुरावा केला.  


विशेष बाब म्हणजे दि १०/०९/२०२०  पर्यंत जवळपास सर्व शेतकरी यांना बागेवरील विमा भरपाई मिळाल्याने आयकर आयुक्त यांच्याबद्दल परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सर्व शेतकरी आणि शिष्टमंडळाने वेळेत प्रश्न सोडविल्याबद्दल आयकर आयुक्त डॉ सचिन मोटे यांचे शेतकऱ्यांनी अभिनंदन केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise