शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली तर, मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य ; कृषि सहायक राहुल कांबळे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली तर, मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य ; कृषि सहायक राहुल कांबळेशेतकऱ्यांनी वेळीच अमेरिकन लष्करी अळीचे उपाययोजना केली तर, मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य ; कृषि सहायक  राहुल कांबळे

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या जिवनक्रमाची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना केली तर या अळीचा प्रादुर्भाव रोखणे व मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते असे मत कृषि सहायक  राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.


 कृषि खात्यामार्फत क्रॉपसॅप अंतर्गत विरकरवाडी येथे आयोजित केलेल्या मका पिकाचे अचुकरित्या संगोपन करुन निर्धारित ऊत्पन्नाबाबत निवडक शेतकऱ्यांच्या शेतीशाळेतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.


मका पिकास योग्य जमिन, माती परिक्षण, पाणी परिक्षण, पेरणी पुर्व शेतजमिनीची मशागत, बिज प्रकिया, पिक वाढीस पाण्याच्या पाळ्या, रासायनिक खतांचा समतोलपणे व आवश्यक तोच अचुकरित्या वापर, पिकवाढीच्या अवस्थेत संभाव्य किडीचा प्रादुर्भाव किड रोखण्यासाठी आवश्यक्तेनुसार किटकनाशकांची फवारणी विशेषत:अमेरिकन लष्करी अळीचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्याची काळजी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव झालाच तर मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व लष्करी अळीच्या जिवन क्रमाची अचुक माहिती उपस्थित शेतकरी बांधवाना श्री.कांबळे यांनी दिली.


या शेतीशाळा वर्गात शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकार उत्तरे देऊन गरज भासेल तेव्हा शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी अथवा वैयक्तिक माझेशी संपर्क साधल्यास आणखी मार्गदर्शन केले जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.


यापुर्वी बिज प्रकिया, दशपर्णी अर्क तयार करणे, जिवामृत तयार करणे, पिकावरील रोगांचा अभ्यासकरुन अचुक रित्या आवश्यक तेच किटनाशकांची फवारणी इत्यादी बाबतच्या प्रात्यक्षिकांचे शेतकऱ्यांच्या शेतीशाळेचे सात वर्ग माण तालुका कृषि अधिकारी प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी सदाशिव बनसोडे यांच्या सहयोगाने घेतले असुन याचा फायदा शेतकरी बांधवाना होऊन त्यांच्या शेतातील पिक उत्पादन वाढीस मदत झाली असल्याचीही माहीती श्री.कांबळे यांनी दिली.


या शेतकरी शेतीशाळेस कृषी मित्र राधेश विरकर, शंकर विरकर, विठ्ठल ढाके, मच्छिंद्र विरकर, वासुदेव सोकासने, मारुती विरकर, रविंद्र विरकर, मधुकर सेकासने, वस्ताद घटुकडे, तुकाराम सजगाने इत्यादी २५ शेतकरी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise