मी माझ्या वक्तव्यावर ठाम ; प्रताप सरनाईक : भाजपकडून महिला आयोगाला हाताशी धरून अटक करायचा खेळ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

मी माझ्या वक्तव्यावर ठाम ; प्रताप सरनाईक : भाजपकडून महिला आयोगाला हाताशी धरून अटक करायचा खेळमी माझ्या वक्तव्यावर ठाम ; प्रताप सरनाईक : भाजपकडून  महिला आयोगाला हाताशी धरून अटक करायचा खेळ


मुंबई : राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक काल कंगना रनौत जर मुंबईमध्ये आली तर शिवसेनेच्या रणरागिणी कंगणाचं थोबाड फोडतील असं वक्तव्य केलं होतं. यावरुन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सरनाईकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.


यावरुन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम’ असल्याचं टिवट केलं आहे. ’मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 106 वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्या मराठी माणसाच्या रक्त सांडून मिळवलेल्या मुंबई बद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही.


भाजपने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून मला अटक करायचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी मी तयार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise