‘त्या’ कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही : या नेत्याने दिला इशारा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 28, 2020

‘त्या’ कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही : या नेत्याने दिला इशारा‘त्या’ कलाकारांच्या चित्रपटांचे चित्रीकरण होऊ देणार नाही : या नेत्याने दिला इशारा 


मुंबई : ज्या चित्रपट कलाकारांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून अंमली पदार्थ सेवन करतात म्हणून शिक्केमोर्तब झाले आहे अशा कलाकारांना चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात काम देऊ नये.

 


अन्यथा अशा चित्रपटांचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल, या कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले यांनी दिला.


सध्या गाजत असलेल्या बालीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या क्षितिज रविप्रसाद कोठडी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी जप्त केलेले ड्रग्ज व बँक व्यवहाराची तपासणी केली जाणार असून त्यातून आणखी काही बडी नावे उघडकीस येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. या प्रकरणात याआधी अनेक आघाडीच्या अभिनेत्रींचीही नावे जोडली गेली आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise