दिघंची परिसरात पावसाने व वाऱ्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या ; दिघंची परिसरातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

दिघंची परिसरात पावसाने व वाऱ्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या ; दिघंची परिसरातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणीदिघंची परिसरात पावसाने व वाऱ्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या ; दिघंची परिसरातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : गेली ४ दिवस पडणाऱ्या पावसाने व वाऱ्याने दिघंची ता.आटपाडी, जि.सांगली परीसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचमाने करावेत व भरपाई मिळावी अशी मागणी दिघंची परीसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली असून याबाबत प्रशासनला निवेदन देण्यात आले आहे.


दिघंची परीसरामध्ये झालेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या डाळिंब, ऊस, मका, बाजरी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पंचमाने करावेत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.


याबाबतचे निवेदन आटपाडीचे नायब तहसीलदार रविंद्र तोडकर यांना देण्यात आले आहे. यावेळी युवा नेते जयवंत सरगर, दिघंची ग्रा.पं. सदस्य केशव मिसाळ, जितु मोरे, बळी रणदिवे व दिघंची परिसरातील शेतकरी उपस्थित होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise