प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्यासाठी 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 7, 2020

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्यासाठी 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

 प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्यासाठी 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित अशा विद्यालय/महाविद्यालय अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती / शिक्षण फी परिक्षा फी / राजर्षी शाहू महाराज गुणवंता शिष्यवृत्ती / वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या योजनेस पात्र असणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थींनी यांनी महाडीबीटी पोर्टलवर यापूर्वी अर्ज भरलेला आहे. तसेच ज्या विद्यार्थांचा अर्ज महाविद्यालय स्तरावर आवश्यक कागदपत्रासाठी प्रलंबित आहे, अशा सर्व पात्र मागासवर्गीय  विद्यार्थांचे परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या त्रुटींची पूर्तता करून महाविद्यालय स्तरावरून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे पाठविण्यासाठी अंतिम मुदतवाढ दिनांक 10 सप्टेंबर पर्यत देण्यात आली आहे. अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी दिली.


सन 2019-2020 मधील त्रुटी पूर्ततेअभावी विद्यार्थी स्तरावर व महाविद्यालय स्तरावर प्रलंबित परिपूर्ण असलेले मागासवर्गीय विद्यार्थांचे अर्ज वरील अंतिम दिनांकापर्यंत पाठविण्यात यावेत. सर्व पात्र असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थी / विद्यार्थींनी यांचे अर्ज अंतिम दिनांकापर्यत न पाठविल्यास  त्यांचा अर्ज पोर्टलमधून आपोआप रद्द होणार आहे. असे झाल्यास परिणामी मागासवर्गीय विद्यार्थी वरील योजनापासून वंचित राहिल्यास किंवा अशा प्रकारची कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहणार आहेत. या योजनेपासून पात्र मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. बन्ने यांनी केले आहे. No comments:

Post a Comment

Advertise