प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदवाढ : सहायक आयुक्त अर्जुन बन्ने - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 1, 2020

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदवाढ : सहायक आयुक्त अर्जुन बन्नेप्रलंबित शिष्यवृत्ती अर्जांसाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदवाढ : सहायक आयुक्त अर्जुन बन्ने

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : जिल्ह्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित अशा विद्यालय/महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या भारत सरकार शिष्यवृत्ती/शिक्षण फी परिक्षा फी/राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती/वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्ता या योजनेस पात्र असणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्याथी/विद्यार्थीनी यांनी महाडिबीटी पोर्टलवर अर्ज भरलेला आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयस्तरावर आवश्यक कागदपत्रांच्या अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज आवश्यक त्या त्रुटींची पुर्तता करुन महाविद्यालयस्तरावरुन भरण्याची अंतिम मुदतवाढ दिनांक 10 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अर्जुन बन्ने यांनी दिली आहे.

 

सन 2019-20 मधील त्रुटी पुर्तते अभावी विद्यार्थीस्तरावर व महाविद्यालयस्तरावर प्रलंबित परिपुर्ण असलेले मागसवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज वरील अंतिम दिनांकापर्यंत पाठविण्यात यावेत. असे सर्व पात्र असणारे मागासवर्गीय विद्याथी/विद्यार्थीनी यांचे अर्ज या अंतिम दिनांकापर्यंत न पाठविल्यास सदरील अर्ज पोर्टल मधून आपोआप रद्द होणार आहेत असे झाल्यास परिणामी मागासवर्गीय विद्यार्थी वरील योजनांपासुन वंचित राहिल्यास किंवा अशा प्रकारची कोणतीही तक्रार निर्माण झाल्यास संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यंना जबाबदार धरणेत येईल. त्यामुळे या योजनांगर्तत एकही मागसवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी असेही श्री बन्ने यांनी कळविले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युजNo comments:

Post a Comment

Advertise