Type Here to Get Search Results !

नागरीकांच्या आंदोलनामुळे म्हसवड मधील कोव्हीड रुग्णालय सुरक्षित स्थळी स्थलांतर



नागरीकांच्या आंदोलनामुळे म्हसवड मधील कोव्हीड रुग्णालय सुरक्षित स्थळी स्थलांतर

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : शासनाने म्हसवड बसस्थानक नजिकच गर्दीच्या ठिकाणी सुरु केलेले कोव्हीड रुग्णालय इतरत्र स्थलांतरीत करावे, रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी यांची आवश्यक त्या संख्येने नियुक्ती करावी, व कोरोना बाधित रुग्णावर योग्य उपचार करावेत या मागणीसाठी येथील नागरिकांनी आज सकाळी बसस्थानक नजिक सातारा पंढरपुर रसत्यावर घोषणाबाजी करीत आंदोलन करुन सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांना लेखी निवेदन दिले.


या आंदोलनानंतर शासनाने संबंधित धन्वंतरी कोव्हीड हॉस्पिटल तात्पुरते बंद करुन येथील कोरोना बाधित रुग्ण शहरापासुन दूर अंतरावरील  असलेले जय भगवान हॉस्पिटल अधिग्रहण  करुन तेथे कोव्हीड रुग्णालय सुरु केले व तेथे रुग्णाना  दाखल केले.


म्हसवड शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे शासनाने स्थानिक पातळीवर रुग्णालय सुरु करावे या मागणीसाठी नागरिकांनी प्रशासनाच्या ठिसाळ कारभाराबाबत गेल्या आठवड्यात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर तीन तास बोंबा बोंब आंदोलन केले होते.


या आंदोलनानंतर खटाव-माणचे प्रांताधिकारी, तहसिलदार,तालुका आरोग्यधिकारी आदींनी म्हसवड येथील धन्वंतरी हॉस्पिटल, दोलताडे हॉस्पिटल व जय भगवान हॉस्पिटल या तीन खाजगी रुग्णालयांची पहाणी करुन हि सर्व रुग्णालये अधिग्रहण करुन ताब्यात घेण्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. परंतु राजकीय दबावाने एकच  हॉस्पिटल तेही नेहमीच गर्दी असलेल्या येथील बसस्थानक लगतचे धन्वंतरी हॉस्पिटल प्रांताधिकारी अश्निनी जिरंगे यांनी संबंधितास तोंडीच सुचना देत अधिग्रहण केले असल्याचे सांगून ताब्यात घेतले व ते शासकीय आरोग्य खात्याच्या स्वाधीन करुन बेफिकीरपणे आपली जबाबदारी पुर्ण केली.


या रुग्णालयाच्या इमारतीत मेडीकल स्टोअर्स व बँकेच एटीएम व  समोर बसस्थानक सातारा-पंढरपुर रस्त्यावरुन नागरिकांची सातत्याने वर्दळ असल्यामुळे हि सर्व नागरिकांच्या गर्दीची ठिकाणे या कोव्हीड रुग्णालयामुळे कोरोना बाधित रुग्णांचा वावर सुरु झाल्यामुळे लगतच्या व्यावसाईक व दुकानदारसह नागरिकांस कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव होऊन कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात असल्यामुळे  संबंधित कोव्हीड रुग्णालय सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे व रुग्णालयात आवश्यक त्या संख्येने कर्मचारी नियुक्त करावे या मागणीसाठी नागरिकांनी अखेर आंदोलनाचा पवित्रा घेऊन आज सकाळी आंदोलन छेडले.या आंदोलनात नगरसेवक दिपक बनगर, तानाजी विरकर,धनाजी पिसाळ, गणेश तुपे,दादा सरतापे, सोमनाथ कबीर, नितिन मेळावणे, संगिता केवटे, सुनिता खाडे, सल्लाऊद्दिन काझी,अशोक काळे इत्यादी नागरिक सहभागी झाले होते. अखेर या आंदोलनास यश येऊन येथील सर्व कोव्हीड रुग्णाना  अधिग्रहन केलेल्या जय भगवान हॉस्पिटल मध्ये स्थलांतरीत करण्यात आले. त्यामुळे म्हसवडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.



या आंदोलनानंतर येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अधिग्रण केलेल्या जय भगवान हॉस्पिटलचे उदघाटन माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रांत अधिकारी अश्विनी जिरंगे,तहसिलदार बाई माने,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर,म्हसवड पालिकेचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून करण्यात येऊन या कोव्हीड रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचारही सुरु करण्यात आले.




Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies