Type Here to Get Search Results !

संपादकीय : अधिवेशनाच्या पाठीमागे कोरोनाचा ससेमिरा....!!!



संपादकीय : अधिवेशनाच्या पाठीमागे कोरोनाचा ससेमिरा....!!!


साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये भारतात आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यात कोरोनाने अलगद प्रवेश केला आहे. त्यानंतर त्याने हळूहळू आपले पाय पसरून मार्च अखेर पर्यंत खरे रूप दाखवायला सुरुवात केली होती. कोरोना महामारीच्या भीतीपोटी संपूर्ण देशामधील सर्व जनतेला दक्ष राहण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारच्यावतीने देण्यात आले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या राज्यातील जनतेला कोरोना पासून सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय गतीने हलचाली सुरू केल्या होत्या.  


दरम्यानच्या काळात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याचे पूर्ण नियोजन झालेले असताना कोरोनाच्या घाईगडबडीमुळे अल्पावधीतच गुंडाळण्यात आले होते. त्यानंतर पाठीमागील जवळ-जवळ पाच महिने झाले, राज्यातील प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग व जनता आपल्या राज्यातून कोरोणाला पराजीत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे, परंतु कोरोना या सर्वांना न जुमानता आपले विदारक रूप राज्यातील जनतेला दाखवत आहे. आता होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर सुद्धा कोरोणाच्या दहशतीचा प्रभाव जास्त झालेला दिसून येत आहे. या अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन येणारे अनेक आमदार यांचा कोरोना संसर्ग झाल्यामुळे ते या अधिवेशनाच्या सभाग्रहात येऊच शकत नाहीत.


तसेच जरी या कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या प्रतिनिधींना वगळून अधिवेशन घेण्याचा प्रयत्न केला तर शारीरिक जवळीक आल्यामुळे चुकून एखाद्या संसर्गजन्य आमदारांच्या मुळे सर्व आमदारांना कोरोना चा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने हे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांमध्येच गुंडाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक आमदार, मंत्री, एवढेच नव्हे तर आधिवेशन बोलावत असलेल्या विधानसभेचे अध्यक्ष, मा. नाना पटोले यांनाही कोरोनाचा संसर्ग झालेला असल्यामुळे जरी महाराष्ट्र शासनाने विधान सभेचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसात आवरण्याचे ठरवले असले तरी, ही या दोन दिवस चालणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर ही कोरोनाची दहशत दिसून येत आहे.  प्रत्येक आमदार अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्या मतदार संघातील वेगवेगळ्या समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकार व विधानसभेचे सभापती यांच्यासमोर मांडत असतात व त्या सोडवून घेत असतात.  


मात्र आपल्या मतदार संघातील जनतेच्या दृष्टीने व विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समस्या अधिवेशनाच्या काळात घेऊन येणारे अनेक आमदार स्वतः कोरोनाचे शिकार झालेले आहेत. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असल्यामुळे त्यांना उपचारासाठी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. तसेच काहीं आमदारांच्या वर उपचार झाल्यानंतर त्यांना होम क्वारंनटाइन करण्यात आलेलं आहे. त्याच बरोबर कोरोनाचा जास्तीत जास्त प्रभाव हा 50 ते 55 वयोगटा पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींच्या वर होत असल्यामुळे, या वयातील बरेच आमदार या अधिवेशनाकडे पाठ फिरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


तसेच काही आमदारानी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले यांना सरळ पत्र पाठवून कळवलं आहे की,' कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आम्ही अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाही'. तसेच विधानसभेचे अध्यक्ष, नाना पटोले यांचा ही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असल्यामुळे त्यांच्यावर उपचार करून ते आजच्या घडीला ठणठणीत बरे झालेले आहेत. परंतु जनतेच्या सेवेसाठी त्यांनी अजून बाहेर पाऊल टाकलेलं नाही, मग ते या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज तरी कसे सांभाळू शकतील..? हा ही मोठा प्रश्न आहे.


एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील जनहिताचे निर्णय तातडीने सरकारला घ्यायला भाग पाडण्यासाठी, आपल्या विभागातील समस्यांचे गाठोडे घेऊन अधिवेशनाच्या ठिकाणी उपस्थित राहणारे आमदारच कोरोनाच्या दहशतीने धास्तावलेले असतील तर, हे पावसाळी अधिवेशन घ्यायचे कसे व जनतेच्या समस्या सोडवायच्या कशा..? किंवा सरकारच्या समोर मांडायच्या कशा...? हा एक मोठा प्रश्न महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे दोन दिवस चालणारे पावसाळी अधिवेशन ही होईल किंवा नाही, याबद्दल ही शंका उत्पन्न होत आहे.


जर हे अधिवेशन प्रत्यक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत सभागृहांमध्ये झाले नाही, तर सभापती महोदयांनी हे अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने बोलावून वेगवेगळ्या विभागातील आमदारांच्या रीतसर समस्या प्रश्न अधिवेशनाच्या पूर्वी प्राप्त करून घेऊन त्यावर वेगवेगळ्या आमदारांची , संबंधित मंत्र्यांची व मुख्यमंत्र्यांची निर्णायक भूमिका ऐकून घेऊन  महाराष्ट्रातील सर्व प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लावावेत. तसेच कोरोना पासून राज्यातील जनतेला वाचवून व जनतेच्या विविध समस्या तातडीने सोडवून अधिवेशन व्यवस्थित पार पाडावे एवढीच अपेक्षा आहे....


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies