डॉ. भूमिका बेरगळ यांना ईगल फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

डॉ. भूमिका बेरगळ यांना ईगल फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीरडॉ. भूमिका बेरगळ यांना ईगल फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : ईगल फाऊंडेशनच्या वतीने  कोरोना महामारीच्या कालावधीत तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल आटपाडी पंचायत समितीच्या सभापती डॉ. भूमिका बेरगळ यांना ईगल फाउंडेशनचा राष्ट्रीय स्तरावरील राजकीय क्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे.  


ईगल फौंडेशन या सेवाभावी नोंदणीकृत संस्थेच्या वतीने मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ, देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात  येणार आहे. सदर निवड केल्याचे संस्थेचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव शेखर सुर्यवंशी, प्रकाश वंजोळे, सुभाष भोसले, प्रा.तुकाराम पाटील, बाबासाहेब राशिनकर, प्रा.स्मिता गिरी, संजय नवले, प्रा. महेशकुमार मोटे, प्रा. सर्जेराव राऊत, अशोक शिंदे, राजेश जोष्टे यांनी जाहीर केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise