दिघंचीचे सरपंच अमोल मोरे कोरोना पॉझिटिव्ह ; संर्पकात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 8, 2020

दिघंचीचे सरपंच अमोल मोरे कोरोना पॉझिटिव्ह ; संर्पकात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन

सरपंच अमोल मोरे दिघंची


दिघंचीचे सरपंच अमोल मोरे कोरोना पॉझिटिव्ह ; संर्पकात आलेल्यांनी काळजी घेण्याचे केले आवाहन 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी : दिघंची ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच अमोल मोरे यांना कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व कोरोनाची लक्षणे दिसल्यास तत्काळ सरकारी रूग्णालयात जावून तपासणी घेण्याचे आवाहन सरपंच अमोल मोरे यांनी केले आहे.


कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा फैलाव तालुक्यात सर्वात जास्त दिघंची गावामध्ये झाला आहे. संपूर्ण गावामध्ये कोरोनाचा फैलाव सुरु आहे. आरोग्य यंत्रणा त्यांचे काम बजावत असले तरी नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडा, नेहमी मास्कचा वापर करा व सोशल डिस्टस्निंगचे पालन करा असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होनराव यांनी नागरिकांना केले आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise