झोपेचे सोंग घेतलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? ट्रान्सफार्म बसविल्यापासून बंद अवस्थेत ; पहा बातमी सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 11, 2020

झोपेचे सोंग घेतलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? ट्रान्सफार्म बसविल्यापासून बंद अवस्थेत ; पहा बातमी सविस्तरझोपेचे सोंग घेतलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का? ट्रान्सफार्म बसविल्यापासून बंद अवस्थेत ; पहा बातमी सविस्तर

माणदेश एक्सप्रेस टीम


अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे येथील शेजाळ तलाव याठिकाणी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी डीपीडीसी या योजने अंतर्गत २५ एचपी स्वतंत्र ट्रान्सपोर्ट बसवण्यात आला होता. परंतु महावितरणच्या गलथान कारभारामुळे अद्यापर्यंत हा ट्रान्सफार्म चालू नसल्यामुळे अजनाळे गावाला पाणीटंचाई तीव्र जाणवू लागली आहे.  


अजनाळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा हा ट्रान्सफार्म दुरुस्त झाला नसल्यामुळे महावितरण च्या कारभाराविषयी ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. या ट्रान्सफार्मचे काम ठेकेदाराने व्यवस्थित केल्या नसल्यामुळे हा ट्रान्सफार्म म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी दयनीय अवस्था झाल्याने झोपलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार? अशी चर्चा अजनाळे गावातील ग्रामस्थांमधून केली जात आहे.


गावाला पाणीपुरवठा करणारी योजना बंद असल्यामुळे गावाला अनेक समस्यांना सामोर जावे लागत आहे. महावितरणच्या कामचुकार अधिकाऱ्यांना लगाम कोण लावणार? गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून एक ट्रान्सफार्म महावितरण ला दुरुस्त होत नसल्यामुळे महावितरणच्या या भ्रष्ट व गलथान कारभार याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. गावाला व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने या ठिकाणी नवीन ट्रान्सफार्म उभारणी करण्यात आली होती. परंतु निर्ढावलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यामुळे हा ट्रान्सफार्म बंद अवस्थेत आहे.


तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेऊन हा ट्रान्सफार्म लवकरात लवकर दुरुस्त करून गावाला पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी गावातील ग्रामस्थांमधून केले जात आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise