दलालांना पोसण्यासाठीच केंद्र सरकारकडून पुन्हा कांद्यावर निर्यात बंदी ; राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर टिका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

दलालांना पोसण्यासाठीच केंद्र सरकारकडून पुन्हा कांद्यावर निर्यात बंदी ; राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर टिकादलालांना पोसण्यासाठीच केंद्र सरकारकडून पुन्हा कांद्यावर निर्यात बंदी ; राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर टिका

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी : दलालांना पोसण्यासाठीच केंद्र सरकारकडून पुन्हा कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आली असल्याची टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी यांची केंद्र सरकारवर केली.


याबाबत त्यांनी ट्वीट करून सरकारवर आरोप केले आहेत. आज कांद्यावर केंद्र सरकारनं निर्यात बंदी घातली. काही दिवसापुर्वी याच केंद्र सरकारकडून कांदा नियंत्रणमुक्त केले व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला.  


आता वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने आज पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतला. या बांडगुळाना पोसण्यासाठी शेतकऱ्या प्रति बेगडी प्रेम दाखवून अजून किती दिवस शेतकऱ्यांचा बळी घेणार आहात? असे ट्वीट केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise