कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 25, 2020

कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये

 


कोरोना रुग्णांसाठी सिटी स्कॅनचे दर 2000 रुपये


मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले असून रोज सुमारे २० ते २४ हजार रुग्ण आढळत आहेत. यातील बहुतेक रुग्णांना छातीतील संसर्ग व न्युमोनियासाठी सिटी स्कॅन काढण्यासाठी डॉक्टरांकडून सांगितले जात असून या सिटी स्कॅनसाठी रुग्णांना किमान साडेतीन हजार ते सात हजार रुपये मोजावे लागतात.


याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.  


त्यानुसार डॉ. शिंदे यांच्या समितीने १६ स्लाईस सिटी स्कॅनसाठी २००० रुपये दर निश्चित केला आहे. याशिवाय १६ ते ६४ स्लाईस क्षमतेच्या मशीनद्वारे केलेल्या सिटी स्कॅनसाठी २५०० रुपये तर ६४ स्लाईससाठी ३००० दर निश्चित केला आहे.  


याबाबतचा आदेश गुरुवारी आरोग्य विभागाने जारी केला असून यासाठी सिटी स्कॅन सुविधा असलेल्या रुग्णालये व केंद्रांबरोबर समितीने सखोल चर्चा केली होती.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise